Ad will apear here
Next
‘तेजोमय’ दिवाळी अंकाचे प्रकाशन
पुणे डॉक्टर्स असोसिएशनच्या (पीडीए) ‘तेजोमय’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन करताना मान्यवर

पुणे : पुणे डॉक्टर्स असोसिएशन (पीडीए) यांच्या वतीने यंदाच्या तेजोमय दिवाळी अंकाचे २१ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रकाशन झाले. यंदाचा अंक हृदयरोगाशी संबंधित माहिती देणारा हृदयभान विशेषांक आहे. पुण्यातील पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात झालेल्या या सोहळ्याला प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून डॉ. जगदीश हिरेमठ आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रा. प्रवीण दवणे उपस्थित होते.



या वेळी डॉ. हिरेमठ यांनी ‘हृदयरोग-प्रतिबंध आणि निवारण’ या विषयावर मार्गदर्शन केले. प्रा. दवणे यांनी ‘हृदयारोग्य-मनाच्या खिडकीतून’ यावर उपस्थितांशी संवाद साधला.

या अंकाचे संपादन डॉ. कविता ढमाले यांनी केले आहे. ‘पीडीए’चे अध्यक्ष डॉ. राजेश माने, सचिव डॉ. मनोहर जाधव, सहसचिव डॉ. ढमाले यांसह वाचनप्रेमी या वेळी उपस्थित होते.

‘हृदयारोग्य- मनाच्या खिडकीतून’ या विषयावर बोलताना प्रा. प्रवीण दवणे


(‘पुणे डॉक्टर्स असोसिएशन’तर्फे प्रकाशित करण्यात आलेला ‘तेजोमय २०१८’ हा हृदयारोग्य विशेषांक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वर उपलब्ध आहे. तो खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. या अंकाविषयी डॉ. कविता ढमाले यांचे मनोगत वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.)




 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/KZMIBT
Similar Posts
धडधड वाढते ठोक्यात... टिकटिक वाजते डोक्यात... पुणे डॉक्टर्स असोसिएशनतर्फे यंदा ‘तेजोमय’ हा दिवाळी विशेषांक हृदयरोग-हृदयारोग्य हा विषय घेऊन प्रसिद्ध करण्यात आला आहे. हृदयरोग होऊ नये यासाठी जीवनशैली कशी ठेवायची आणि हृदयरोग झालाच तर भांबावून न जाता नेमकं काय करायचं, याचं मार्गदर्शन करणारे तज्ज्ञांचे लेख, मुलाखती या अंकात आहेत. तसेच अन्य साहित्यिक मेजवानीही आहेच
...आणि दिवाळी पहाट खुलू लागली दिवाळीची पहाट सांगीतिक कार्यक्रमाने खुलवण्याची पद्धत आज सर्वदूर रूढ झाली आहे. ९०च्या दशकात ही संकल्पना पहिल्यांदा रुजली, ती राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात. उत्साही आणि रसिक पुणेकरांनी या संकल्पनेला उदंड प्रतिसाद दिला आणि मग विविध संस्थांमार्फत ‘दिवाळी पहाट’चे आयोजन केले जाऊ लागले. राज्याच्या अनेक भागांतही ती पोहोचली
शून्य मी संपूर्ण... १० एप्रिल हा गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन. त्या निमित्ताने, किशोरीताईंच्या आठवणींना उजाळा देणारा ‘शून्य मी संपूर्ण’ हा सुधीर कुलकर्णी यांचा दीर्घ लेख प्रसिद्ध करत आहोत. हा लेख ‘चतुरंग अन्वय’च्या २०१७च्या दिवाळी अंकात प्रकाशित झाला होता.
‘शतायुषी दिवाळी अंकाचे कार्य अनुकरणीय’ पुणे : ‘सध्याच्या डिजिटल युगात आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या काळात वैद्यकीय क्षेत्रातील दैनंदिन गरजेची माहिती, विविध विकाराचे स्वरूप, त्यावरील संशोधन आणि उपाय हे वाचकांपर्यंत सोप्या भाषेत पोहचविण्याचे कार्य शतायुषी दिवाळी अंकाच्या वतीने अव्याहतपणाने सुरु आहे. हा अतिशय अनुकरणीय उपक्रम आहे’, असे गौरवोद्गार नाट्य-चित्रपट दिग्दर्शक डॉ

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language